बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींच्या जोडीला ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन पाहणं नेहमीच प्रेक्षकांना आवडतं. त्यापैकीच एक जोडी म्हणजे रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित. २४ वर्षांपूर्वी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात त्यांनी बहिणींची भूमिका साकारली आणि आता बऱ्याच वर्षांनंतर ते पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येत आहेत. माधुरीच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटात रेणुका शहाणेसुद्धा झळकरणार आहेत. ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाच्या सेटवर मिळालेल्या फावल्या वेळेत माधुरी- रेणुका यांनी जी धम्माल केली, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
‘हम आपके है कौन’ चित्रपटातील ‘लो चली मैं’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं. आजही हे गाणं वाजलं की रेणुका, माधुरी आणि सलमानचा डान्स सहज डोळ्यांसमोर उभा राहतो. ‘बकेट लिस्ट’च्या सेटवर एकाने अचानक हे गाणं लावलं आणि त्यावेळी माधुरी आणि रेणुका थिरकण्यापासून स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत. २४ वर्षांनंतर दोघींनी पुन्हा एकदा त्याच गाण्यावर ठेका धरला आणि खूप धम्माल केली. या दोघींना एकत्र नाचताना पाहणं आजही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.
This just brought the hugest smile to my face!!!!! #HumAapkeHaiKaun is a sunshine film!!! https://t.co/keYQvrHnVC
— Karan Johar (@karanjohar) May 20, 2018
वाचा : विवेक- ऐश्वर्याच्या लग्नाला नागराज मंजुळे का राहिले उपस्थित?
माधुरीने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही बंध कधीच जुने होत नाहीत, असं कॅप्शन तिनं या व्हि़डिओला दिला आहे. तर करण जोहरनेही हा व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं ट्विट केलं. ‘बकेट लिस्ट’ येत्या २५ मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी अनेकजण उत्सुक आहेत.