‘हम आपके है कौन’ चित्रपटात बहिणींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांनी त्यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकलेली. आपल्या अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्री आता तब्बल २३ वर्षांनी एकत्र येणार आहेत. तेजस देवसकर दिग्दर्शित एका मराठी चित्रपटात या दोघी भूमिका साकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माधुरीला मराठी चित्रपटात कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या चाहत्यांना लागून राहीली आहे. चाहत्यांची ही इच्छा या चित्रपटामुळे आता पूर्ण होणार आहे. तर पुन्हा एकदा माधुरीसोबत काम करायला मिळणार म्हणून रेणुकासुद्धा उत्सुक आहे. ‘काही वर्षांपूर्वी तेजस आणि माझी एका माहितीपटाच्या निमित्ताने भेट झालेली. पण काही कारणाने त्यावर पुढे काही काम झालं नाही. पण तरीही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. अचानक एक दिवस तेजस हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आला. यामध्ये माधुरी मुख्य भूमिका साकारणार असल्याचं त्याने सांगितलं. तिने मराठी चित्रपटात काम करावं ही खूप दिवसांपासूनची माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचा विषयसुद्धा आवडल्याने मी लगेच होकार दिला,’ असं रेणुका म्हणाल्या.

वाचा : ‘पद्मावती’च्या शूटिंगदरम्यान रणवीर रडला होता

माधुरीविषयी सांगताना ती पुढे म्हणाली की, “आमच्या दोघींची पार्श्वभूमी सारखीच आहे. तिची आई जेव्हा सेटवर यायची तेव्हा आम्ही मराठीमध्येच गप्पा मारायचो. इतकं यश संपादन करुनही तिला अजिबात त्याचा गर्व नाही.” “मी नेहमी म्हणते की, तुम्हाला माधुरीसोबत काम कराण्याची संधी मिळाल्यास, ही संधी दिल्याबद्दल तुम्ही निर्मात्यालाच पैसे देऊ केले पाहिजेत.” अशा शब्दांत रेणुकाने माधुरीविषयी भावना व्यक्त केल्या.