अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या आगामी ‘गुलाब गँग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुजरामध्ये दाखल झाली. देशातील ७५ टक्के महिलांना त्यांच्या सशक्तीकरणाची जाणीव नसल्याचे माधुरीने यावेळी म्हटले. गुलाब गँगमधून महिलांना त्यांच्या सशक्तीकरणाची, त्यांच्यातील प्राबल्याची जाणीवर होईल असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.
तसेच अभिनेत्री जुही चावलासोबत काम करताना भरपूर आनंद झाल्याचेही माधुरीने म्हटले.
परंतु, याआधी भोपाळमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेलेल्या माधुरीचा तेथील विमानतळावरील अधिकाऱयाने अपमान केला. याबद्दल माधुरीला विचारले असता मी याविषयी कोणतेही वक्तव्य करू इच्छित नसल्याचे माधुरीने सांगितले.
भोपाळ विमानतळावर नेमके काय घडले? –
भोपाळमध्ये गुलाब गँग चित्रपटाचे प्रमोशन करून झाल्यानंतर माधुरी मुंबईला परतण्यासाठी विमानतळावरील ‘व्हीआयपी लाऊंज’मध्ये थांबली होती. तेथील एका अधिकाऱयाने तिच्यासह छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. प्रमोशन कार्यक्रमानंतर थकल्यामुळे माधुरीने अधिकाऱयासोबत छायाचित्र काढण्यासाठी नकार दीला. यावर नाराज झालेल्या अधिकाऱयाने माधुरीला लगेच व्हीआयपी लाऊंजबाहेर जाण्यास सांगितले.