कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ हा लोकप्रिय शो आहे. या शोच्या दहाव्या सीझनमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरही सहभागी झाली आहे. याशोमध्ये अमृताने ‘डोला रो डोला’ गाण्यावर डान्स केला. अमृताचा डान्स पाहून माधुरी दीक्षितलाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरी दीक्षित आणि अमृता खानविलकरचा ‘डोला रो डोला’ या गाण्यावरील डान्स करतानाचा व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अमृतासह माधुरी दीक्षित ‘डोला रो डोला’ गाण्याच्या हूक स्टेप करताना दिसत आहे. अमृता आणि माधुरी दीक्षितचा डान्स पाहून करण जोहर “झलक दिखला जा शोमधील आजवरचा हा सगळ्यात चांगला क्षण आहे”, असं म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा >> सिनेमाच घडतोय जॉनी डेपच्या आयुष्यात; अँबर हर्डशी घटस्फोटानंतर पडला वकिलाच्या प्रेमात

हेही वाचा >> ‘ब्रह्मास्र’साठी किती मानधन घेतले?, रणबीर कपूरने केला खुलासा, म्हणाला…

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये परीक्षक आहे. या शोमधील एका भागात अमृताने कोरिओग्राफर आशिष पाटीलबरोबर ‘डोला रो डोला’ गाण्यावर डान्स केला. अमृताचा डान्स पाहून माधुरीही थक्क झाल्याचं दिसत आहे. अमृताने देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ गाण्यावर गणेशोत्सवादरम्यान डान्स केल्याची आठवण तिने मुलाखतीदरम्यान सांगितली होती.

हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

“मला आजही माझा पहिला परफॉर्मन्स फार चांगला आठवतोय. पुण्यात गणेशोत्सवात फार धामधूम असायची. त्यावेळी मी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच नृत्य केले होते. मी माधुरी दीक्षित यांच्या २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर मी नृत्य करण्याचे ठरवले होते”, असं ती म्हणाली.

हेही पाहा >> Photos : ब्रालेट टॉप आणि साडीत अक्षयाच्या कातिल अदा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुंदरा मनामध्ये भरली’

“मी माझा पहिल्या नृत्याच्या सार्वजनिक कार्यक्रमात चक्क सतरंजीवर नाचली होती आणि आता मी तिच्या समोर नृत्य सादर करत आहे, यावर मला विश्वासच बसत नाही. त्या माझ्या आदर्श आहेत. माझ्या नृत्याच्या प्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले”,असंही अमृताने सांगितलं होतं.  

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit dance with amruta khanvilkar on jhalak dikhlaja set karan johar commented video viral kak