इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात चालू असलल्या संघर्षावरून सोशल मीडियावर ‘All Eyes on Rafah‘ अर्थात ‘रफावर सर्वांच्या नजरा…’ कॅपेन सुरू आहे. ‘All Eyes on Rafah’ लिहिलेलं एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हा फोटो शेअर केला. सिनेसृष्टीतील धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही हा फोटो शेअर केला होता. परंतु, त्यानंतर तिने ती स्टोरीच डिलिट केली. यावरून आता तिला ट्रोल केलं जातंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासहित जगभरातील अनेक सेलीब्रिटींनी हे छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये एका वाळवंटी भागात खूप मोठ्या प्रमाणावर तंबू दिसतात. त्यातील काही तंबूंची विशिष्ट प्रकारे मांडणी करून ‘All Eyes on Rafah’ हे वाक्य साकारण्यात आल्याचे या छायाचित्रामध्ये दिसत आहे. अनेक जण #AllEyesOnRafah हा हॅशटॅगही वापरताना दिसत आहेत. माधुरी दीक्षितनेही हा फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीला ठेवला होता.

माधुरी दीक्षितने काही वेळानंतर तिची ही इन्स्टा स्टोरी डिलिट केली. तिने पोस्ट डिलिट केल्यानंतर तिच्या एका फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तिने गुलाबी रंगाच्या एका ड्रेसमधील फोटो शेअर केलाय. या फोटोच्या खाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे एकाने लिहिलं आहे की, कोणाच्या तरी सांगण्यावरून पोस्ट करणे आणि ते नंतर डिलिट करणे हे दयनीय आहे. यामुळे मी खूप निराश झालेय. अनेकांनी माधुरी दीक्षितला अनफॉलो केले असून तिच्या या कृतीचा निषेध केला आहे. संदेशखाली आणि काश्मीर पंडितांवर अत्याचार सुरू होते तेव्हा कुठे होतात? असाही प्रश्न माधुरी दीक्षितला विचारण्यात आला आहे. तसंच, पैशांसाठी आता दहशतवाद्यांनाही पाठिंबा दिला का? असंही विचारण्यात आलं.

हेही वाचा >> ‘All Eyes On Rafah’ लिहिलेले छायाचित्र आलिया भट्टसह अनेक सेलीब्रिटींनी का शेअर केले आहे?

काय आहे #AllEyesOnRafah?

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. गाझाच्या दक्षिण भागात वसलेल्या रफा शहरामध्ये इस्रायलने हल्ला केल्यानंतर जगभरात निषेधाचे सूर उमटताना दिसत आहेत. कारण पॅलेस्टिनी विस्थापितांनी उभ्या केलेल्या शरणार्थी छावणीवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोक मारले गेले आहेत. त्यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्धांचा समावेश असून, अनेक लोक जखमीही झाले आहेत. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामध्ये कमीत कमी ४५ पॅलिस्टिनी लोक मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू झाल्यापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक पॅलेस्टिनी लोक रफामध्ये एके ठिकाणी विस्थापित झाले आहेत. या विस्थापितांच्या तंबूंवर हा हल्ला झाला आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे जगभरात मानवी हक्कांची चाड असलेल्या लोकांकडून इस्रायलच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे.

‘All Eyes On Rafah’ मोहिमेला जगभरातून पाठिंबा

या हल्ल्यामुळे जळून भस्मसात झालेल्या मृतदेहांचे अवशेष, तसेच जखमी लोकांची छायाचित्रे गतीने समाजमाध्यमांवर प्रसारित होऊ लागली. ‘All Eyes on Rafah’ अर्थात ‘रफावर सर्वांच्या नजरा…’ अशा मथळ्यासह लोक आपल्या भावना व्यक्त करू लागले. बघता बघता हा मथळा ट्रेंड होऊ लागला. मानवी हक्क कार्यकर्ते, तसेच संवेदनशील लोकांकडून या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठविण्यात येऊ लागला. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या हाहाकाराकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधणे आणि हा नरसंहार तातडीने बंद व्हावा, यासाठीची संवेदनशीलता वाढविणे हा या मोहिमेचा हेतू आहे. या मोहिमेमध्ये ‘All Eyes on Rafah’ असे लिहिलेले एक छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे विशिष्ट प्रकारे तंबूंची मांडणी करून हे वाक्य साकारण्यात आल्याचे या छायाचित्रामध्ये दिसत आहे. आतापर्यंत ३४ दशलक्षांहून अधिक लोकांनी इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit deletes her all eyes on rafah post internet reacts pathetic very disappointed sgk
Show comments