‘देढ इश्किया’ या विशाल भारद्वाजच्या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि नसिरूद्दीन शाह यांच्यात अनेक इंटिमेट दृश्ये असल्याची चर्चा चित्रपट रसिकांत रंगली असतानाच, आपल्याला ही दृश्ये साकारताना खूपच अवघडल्यासारखे झाल्याचे माधुरीने म्हटले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माधुरी म्हणाली, नसिरूद्दीन शाह यांच्याबरोबर काम करताना आपल्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. अभिनय करताना ते आपल्या डोळ्यातून अतिशय प्रबळ अशा भावना व्यक्त करतात. त्यांच्याबरोबरची जवळची दृश्ये साकारताना मला खूप लाजायला झाले. त्यांचा अभिनय अतिशय नैसर्गिक असल्याने, त्यांच्यासोबत अभिनय करताना तुम्हाला केवळ प्रतिक्रिया द्यायची असते. नसिरूद्दीन यांच्याबरोबर काम करताना दडपण येत नाही. मी फक्त चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा साकारत असल्याचे देखील ती म्हणाली.
या चित्रपटात माधुरी दीक्षित बेगम पाराची भूमिका साकारत असून, चित्रपटाची कथा आणि ती साकारत असलेल्या व्यक्तीरेखेमुळेच या चित्रपटाला होकार दिल्याचे तिने सांगितले. २०१० मध्ये आलेल्या ‘इश्किया’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. नसिरूद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांच्या व्यक्तीरेखा मागील चित्रपटातील व्यक्तीरेखेप्रमाणेच असून, माधुरी आणि हुमा कुरेशी पहिल्यांदाच काम करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा