प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा पुकार हा चित्रपट कोणताही प्रेक्षक विसरणं शक्य नाही. अभिनेत्री माधुरी दीक्षित, अनिल कपूर आणि नम्रता शिरोडकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. त्याचसोबत सुपरस्टार प्रभूदेवाच्या एण्ट्रीने या चित्रपटाला चार चाँद लागले. त्यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. नुकतीच या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण झाली असून माधुरीने या चित्रपटातील काही आठवणींना उजाळा दिला आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘पुकार’ या चित्रपटातील काही सीन्सचा कोलाज करुन तो शेअर केला आहे. या फोटोमध्ये माधुरीसोबत अभिनेता अनिल कपूर दिसून येत आहे.

दरम्यान, सध्या माधुरीने शेअर केलेल्या या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. पुकार हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात माधुरी आणि अनिल कपूर व्यतिरिक्त नम्रता शिरोडकर, प्रभूदेवा,ओम पुरी, डॅनी डेन्झोप्पा,विजू खोटे अशा अनेक दिग्गजांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Story img Loader