बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरी ‘फाइंडिंग अनामिका’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून माधुरी चित्रपटात दिसली नाही, त्यामुळे तिचे चाहते ‘फाइंडिंग अनामिका’ची आतुर्तेने प्रतिक्षा करत आहेत. आता या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधुरीने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला असून हा प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये माधुरी एका गाडीतून उतरताना दिसते आणि तिचे चाहते तिची प्रतिक्षा करत असल्याचे पाहायला मिळते. तेवढ्यात बॅकग्राऊंडला एका माणसाचा आवाज येतो, तो विचारतो, “तर मला सांगा, अनामिका आनंद असणे कसे वाटते?” यावर माधुरी म्हणते, “बरं वाटतं, खरं सांगू, इतक्या वर्षांनंतरही हे माझं आयुष्य आहे हे खरं वाटतं नाही. मी स्वतःला भाग्यवान समजते. कोणाचीही नजर लागायला नको.” माधुरी या चित्रपटातून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

आणखी वाचा : ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

चित्रपटाची कथा एका सुपरस्टारची आहे जी एक दिवस अचानक गायब होते. या चित्रपटाची कथी ही श्री राव आणि निशा मेहता यांनी लिहिली आहे. माधुरी व्यतिरिक्त संजय कपूर, सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी आणि मानव कौल सारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरने केली आहे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit finding anamika teaser released dcp