अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘देढ इश्किया’ चित्रपटात माधुरी आणि नसिरुद्दीन शाह प्रणय दृश्य करताना दिसणार आहेत. ‘देढ इश्किया’ हा ‘इश्किया’ चित्रपटाचा सिक्वल आहे. २०१० साली आलेल्या ‘इश्किया’ चित्रपटात विद्या बालन आणि अर्शद वारसी यांनी काही हॉट दृष्ये दिली होती, आता ‘देढ इश्किया’ या त्याच्याच सिक्वलमध्ये माधुरी आणि नसिरुद्दीन काही हॉट दृष्ये करताना दिसणार आहेत.
याबाबत अभिषेक चौबेने म्हटले आहे की, प्रणय दृष्ये चित्रित करणे सोपे नसते. कलाकारांनी माझ्या कल्पनाशक्तीवर विश्वास ठेवणे गरजेचे असून, दोन्ही कलाकारांना कुठेही ओशाळलेले वाटणार नाही याची मला खात्री बाळगावी लागते. याशिवाय, चित्रपटात हुमा कुरेशी आणि अर्शद वारसी यांची देखील प्रणय दृष्ये असल्याचे त्याने म्हंटले आहे.
‘देढ इश्किया’ मध्ये माधुरी दीक्षित बेगम पाराची भूमिका साकारत असून, ‘इश्किया’ चित्रपटातील विद्या बालनच्या भूमिकेपेक्षा तिची भूमिका फार वेगळी आहे. या सिक्वलमध्ये नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांच्या भूमिकांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या चित्रपटाचे निर्माते विशाल भारद्वाज आणि सहनिर्माते ‘शेमारू प्रॉडक्शन’ असून चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader