आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरीचे लाखो चाहते आहेत. माधुरी आता तिच्या पन्नाशीत असली तरी ती आजही तितकीच सुंदर आणि उत्साही दिसून येते. माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आता माधुरीने एका कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे तिच्या आईला किती आनंद झाला हे तिने सांगितले आहे.
माधुरीने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. माधुरी एक मरामोळी मुलगी आहे. त्यामुळे तिचं मराठीवर असलेलं प्रेम कोणापासून लपलेल नाही. माधुरीने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली होती. एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावल्याने माधुरी आनंदी आणि उत्साही होती. यावेळी ती एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहे हे ऐकून तिच्या आईची काय प्रतिक्रिया होती हे तिने सांगितले आहे. ‘माझ्या आईला जेव्हा मी सांगितलं की मी एका मराठी कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे, तेव्हा ती खूप खुश झाली होती,’ असे माधुरी म्हणाली. तिचा हा व्हिडीओ राजश्री मराठी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
एवढंच नाही तर माधुरीने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांचे कौतुक केले. तर तिचे आणि तिच्या आईचे मराठीवर असलेले प्रेम पाहून उपस्थित असलेल्या सगळ्यांना आनंद झाला. सध्या माधुरी डान्स दीवाने या शोची परिक्षक आहे.