सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘गुलाब गॅग’मध्ये माधुरी दीक्षित नेने आणि जुही चावला झळकणार आहेत. ९०च्या दशकात प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने जादू करणा-या या दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करत आहेत. माधुरी आणि जूहीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित चक्क ‘ढिशुम ढिशुम’ करताना दिसेल तर अभिनेत्री जुही चावला एक राजकारणी व्यक्तिमत्व साकारले आहे. स्त्रीप्रधान व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित प्रथमच आपल्या प्रतिमेतून बाहेर पडत हाणामारीची दृश्ये करताना दिसणार आहे. तर आपल्या खटय़ाळपणाच्या, साध्या-सरळ व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री जुही चावला ‘गुलाब गँग’द्वारे प्रथमच महिला राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारली आहे.
‘गुलाब गँग’ चित्रपट संपतपाल देवी यांच्या आयुष्यावरील नाही
७ मार्चला जागतिक महिला दिन असतो. हा चित्रपट सर्व महिलांना एक मानवंदना असल्यामुळे महिला दिनी गुलाब गॅंग प्रदर्शित करणे अतिशय योग्य ठरेल, असे चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा यास वाटते. नवोदित दिग्दर्शक सैमिक सेनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.