लोकसत्ता प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘धक धक’ गर्ल म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. मात्र एकंदरीतच मराठी आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करण्यापेक्षा सध्या ती निर्मितीत अधिक रमली आहे. पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर चित्रपटनिर्मितीत रमलेल्या माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा दुसरा मराठी चित्रपट नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटनिर्मितीसाठीच प्राधान्याने काम करणार असल्याचे माधुरीने जाहीर केले. 

amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
salim javed marathi news
सलीम-जावेद यांची जोडी का दुभंगली?
Kranti Redkar twin daughters started crying After watching the movie Kakan
Video: “मम्मा, तू चुकीचा चित्रपट बनवला…” ‘काकण’ची कथा ऐकून क्रांती रेडकरच्या मुली ढसाढसा लागल्या रडू, म्हणाल्या…
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
Thief arrested for stealing from Marathi director Swapna Joshi house Mumbai news
मुंबई: मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला अटक
75 theaters soon in maharastra says sudhir mungantiwar at marathi film awards ceremony
राज्यात लवकरच ७५ चित्रनाट्यगृहे; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात घोषणा

 करोनाच्या आधी २०१९ मध्ये माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘आरएनएम’ या नावाने चित्रपटनिर्मिती संस्थेची सुरुवात केली होती. ‘१५ ऑगस्ट’ हा त्यांची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट २०१९ मध्ये थेट नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला. आता पुन्हा एकदा मराठीतील नव्या- जुन्या ताकदीच्या कलाकारांना घेऊन केलेल्या ‘पंचक’ या चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल आवटे आणि जयंत जठार यांनी केलं आहे, तर चित्रपटात दिलीप प्रभावळकर, आदिनाथ कोठारे, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशीष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हिंदीत नावलौकिक मिळवल्यानंतर मराठी चित्रपटनिर्मितीवरच जोर का द्यावासा वाटला? याबद्दलचा खुलासा माधुरीने या वेळी केला.

ओटीटीवर जगभरात सिनेमा पाहिला जातो.. 

माधुरीची निर्मिती असलेला पहिला चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. ‘पंचक’ हा दुसरा चित्रपट पहिल्यांदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट बनवतानाच तो ओटीटीसाठी बनवायचा आहे की चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा आहे याचा पहिल्यांदा विचार केला जातो, असं तिने सांगितलं. त्याचं कारण स्पष्ट करताना प्रादेशिक चित्रपटांसाठी ओटीटी माध्यम महत्त्वाचं ठरलं असल्याचं तिने स्पष्ट केलं. ओटीटीवर प्रदर्शित झालेला प्रादेशिक चित्रपट जागतिक स्तरावर पाहिला जातो. ‘१५ ऑगस्ट’ या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी छान प्रतिसाद दिला. त्यानंतर करोनाकाळामुळे हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहात प्रदर्शित करू शकलो नाही; पण ‘पंचक’चा विषय पाहता हा चित्रपट फक्त ओटीटी माध्यमांवरील प्रेक्षकांसाठी नाही. तो ग्रामीण भागातील प्रेक्षकांनीदेखील आवर्जून पाहावा असा आहे. म्हणूनच ‘पंचक’ हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, असं तिने सांगितलं.

 ‘पंचक’ सर्वार्थाने खास.. 

 ‘पंचक’ या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचा विषय, त्यातील कलाकार हे सगळं पाहता तो सर्वार्थाने खास चित्रपट असल्याचं माधुरीने सांगितलं. या चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार आहेत ही एक बाब झाली. चित्रपटाची कथा उत्तम आहे. हल्ली प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात, असं निरीक्षण तिने नोंदवलं. ‘पंचक’ हा आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनेवर आणि त्याअनुषंगाने कौटुंबिक नात्यांवरही भाष्य करणारा चित्रपट आहे. खरं तर चित्रपटातील मध्यवर्ती घडणारी घटना म्हणजे एक विचित्र स्थिती आहे; परंतु अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक आणि विनोदी निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, अशी माहिती माधुरीने दिली. 

‘पंचक’ हा चित्रपट नायिकाप्रधान नाही आहे, मात्र या चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा अधिक आहेत. त्यामुळे मराठीतील अनेक दमदार अभिनेत्री चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भारती आचरेकर, तेजश्री प्रधान, नंदिता पाटकर, संपदा कुलकर्णी, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर या सहा मुख्य अभिनेत्री चित्रपटात आहेतच, शिवाय या चित्रपटाचं छायाचित्रण करणारीही एक स्त्री आहे, याकडे माधुरीने लक्ष वेधलं. आपल्या भारतीय कुटुंबात अनेकदा महत्त्वपूर्ण भूमिका घरातील स्त्रियाच सांभाळत असतात, असं माधुरीने सांगितलं. त्यामुळे या चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका स्त्रियांनीच सांभाळल्या आहेत, असं सांगतानाच या चित्रपटाचा डोलाराच अनेक स्त्रियांनी मिळून उचलला आहे, असं कौतुकही माधुरीने केलं. 

 ‘पंचक’ हा चित्रपट सर्व वयोगटांतील आणि सर्व स्तरांतील प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वास माधुरीने व्यक्त केला. त्यामागचं कारण स्पष्ट करताना कोणत्याही घरात घडणारी अशी गोष्ट. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे आपल्याला आजूबाजूच्या कोणत्या ना कोणत्या  घरात पाहायला मिळणारं असंच आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रत्येकालाच आवडेल, त्यांना आपलासा वाटेल, ते त्या गोष्टीशी स्वत:ला जोडून घेऊ शकतील असं आपल्याला वाटत असल्याचंही माधुरीने सांगितलं.

मला व्यक्तिगत विचाराल तर मराठी नाटक आणि मराठी चित्रपट हे नेहमीच खूप आवडतात. मराठी भाषेमध्ये सादर करण्यात येणारे विषय, नाटक-चित्रपटांतून केलं जाणारं सादरीकरण आणि त्यासाठी कलाकारांकडून घेतली जाणारी मेहनत हे सगळंच कौतुकास्पद आहे. विषयाला फाटे न फोडता, पाल्हाळ न लावता नेमका विषय मांडणारे सादरीकरण ही मराठी चित्रपटांची खासियत आहे. मी स्वत: मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संस्कृती, ऐतिहासिक ठेवा, आपलं राहणीमान याची मला खूप जवळून माहिती आहे त्यामुळे मी आणि श्रीराम यांनी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करतानाच मराठी चित्रपटनिर्मितीच करायची हे पक्कं ठरवलं होतं. माधुरी दीक्षित