बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) नुकताच त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. करणने चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सगळ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पार्टीतले सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. पण यावेळी सगळ्यांचे लक्ष हे धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) , अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानच्या (Sharukh Khan) एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
माधुरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत माधुरी पती डॉक्टर नेने, सलमान, शाहरुख आणि पत्नी गौरी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत ‘गप्पा मारायला खूप काही आहे’, असे कॅप्शन दिले आहे. या तीघांनी ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर हे तीनही कलाकार कधी एकत्र दिसले नाही. पण आता त्या तीघांना करणच्या पार्टीत एकत्र पाहून माधुरी, सलमान आणि शाहरुखच्या चाहत्यांना आनंद झाला.
आणखी वाचा : २५ लाख रुपये किंमत असलेल्या शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची नेम प्लेट गायब?
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
करण जोहरने त्याची पार्टी यशराज स्टूडिओमध्ये अरेंज केली होती. या पार्टीला जवळपास पूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली. त्यामध्ये आमिर खान, सैफ अली खान, करीना कपूर, मलाइका अरोरा, प्रिती झिंटा, क्रिती सेनॉन, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ट्विंकल खन्ना, रणवीर सिंह या कलाकारांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड स्टार किड्समध्ये जाह्नवी कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सारा अली खान देखील तेथे उपस्थित होते. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानानेही हजेरी लावली होती.