बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता अनिल कपूर यांची जोडी ही मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. माधुरीला आज ही लोक ‘धक धक गर्ल’ या नावाने ओळखतात. इंद्र कुमार यांच्या ‘बेटा’ या चित्रपटातील ‘धक धक करने लगा’ या गाण्यामुळे तिला हे नाव मिळाले. या गाण्यामुळे एका रात्रीत माधुरीला लोकप्रियता मिळाली. मात्र, इंद्र कुमार यांची या चित्रपटासाठी पहिली पसंती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी होत्या.
जेव्हा इंद्र कुमार यांनी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी श्रीदेवी यांना विचारले होते. कारण चित्रपटाची संपूर्ण कहाणी ही श्रीदेवी यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. पण त्यावेळी श्रीदेवी यांच्याकडे अनेक चित्रपट होते. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. मग इंद्र कुमार यांनी माधुरीला या चित्रपटासाठी विचारले.
माधुरीने ‘बेटा’ चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर श्रीदेवी यांची लोकप्रियता ही हळू हळू कमी होऊ लागली होती. तर दुसरी माधुरीची ओळख आणि लोकप्रियता ‘धक धक गर्ल’ म्हणून होऊ लागली होती.
आणखी वाचा : बेडकासारखा आवाज आहे म्हणणाऱ्या ट्रोलरला फरहान अख्तरने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला…
‘बेटा’ हा चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात श्रीदेवी आणि चिरंजीवी यांची जोडी पाहायला मिळाली होती. ‘धक धक करने लगा’ या गाण्याची कल्पनाही त्याच चित्रपटातील एका तेलगू गाण्यातून आली होती. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये श्रीदेवीने काम केले नाही आणि माधुरी एका रात्रीत लोकप्रिय झाली.
View this post on Instagram
‘बेटा’ या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत अनिल कपूर, अनुपम खेर आणि अरूणा इराणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. अनिल कपूर, माधुरी तसेच अरुणा यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर, सरोज खान यांना धक-धक या गाण्याच्या उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी पुरस्कारही मिळाला.