बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. एवढ्या सुपरहिट चित्रपटानंतरही माधुरीला आजही तिच्या एका चित्रपटाबद्दल पश्चाताप होतो. हा चित्रपट म्हणजे ‘दयावान’. यात तिने बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबतचा स्क्रीन शेअर केली होती.

‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी अनेक रोमँटिक आणि किसिंग सीन दिले होते. ज्यामुळे आजही हा चित्रपट चर्चेत असतो. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या किसिंग सीनमुळे खळबळ उडाली होती. माधुरीचा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबतचा तो सीन चर्चेचा विषय ठरला होता.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
Aishwarya Rai refused Hollywood film with Brad Pitt because she had made promises in India
ऐश्वर्या रायने नाकारलेला ब्रॅड पिटबरोबरचा हॉलीवूड चित्रपट, अभिनेता म्हणालेला, “पाश्चिमात्य देशांमध्ये…”

माधुरी दीक्षितनेही अनेकदा विनोद खन्ना यांच्यासोबतच्या त्या किसिंग सीनवर अनेकदा भाष्य केले आहे. काही वर्षापूर्वी माधुरीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला या चित्रपटातील किसिंग सीनबद्दल विचारण्यात आले होते. यावर ती म्हणाली, “जेव्हा मी याकडे मागे वळून पाहते, तेव्हा मला असं वाटतं की मी त्याला नाही म्हणायला हवे होते. त्यावेळी मला हे करायचं नाही, असे मी सांगायला हवे होते. पण तेव्हा कदाचित मला हे सांगायला भीती वाटली असावी. त्यावेळी मला वाटले की मी एक अभिनेत्री आहे आणि दिग्दर्शकाने लिहिलेल्या गोष्टी नाकारणे, हे या चित्रपटासाठी चुकीचे ठरेल.”

“माझ्या कुटुंबातील कोणीही सिनेसृष्टीतील नाही. त्यामुळे मला या ठिकाणी कसे काम चालते, याची माहिती नव्हती. त्यामुळे एखादा किसिंग सीन नाकारताना त्यावेळी काय बोलायचे याची मला काहीही माहिती नव्हती. म्हणून मी हा सीन केला. त्यानंतर जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की मी हे का केले? या किसिंग सीनमुळे चित्रपटात विशेष काही घडले नाही. यानंतर मात्र मी ठरवले की आता यापुढे मी किसिंग सीन कधीच करणार नाही”, असेही तिने म्हटले.

“…अन् त्यामुळे मी तणावाखाली”, अमिताभ बच्चन यांनी दिले ‘त्या’ ट्विटबद्दल स्पष्टीकरण

लग्नानंतर माधुरी दीक्षितने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर परतल्यानंतर तिने ‘आजा नचले’, ‘देढ इश्किया’, ‘गुलाब गँग’, ‘बकेट लिस्ट’, ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतंच माधुरीने नेटफ्लिक्सच्या ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. या मालिकेत माधुरीसोबत संजय कपूर आणि मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत.