धकधकगर्ल माधुरीने ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात आयटम सॉंग केल्यानंतर पुन्हा एका नृत्यासाठी ती तयार आहे. संजय लीला भन्सालींचा आगामी चित्रपट ‘रामलीला’मध्ये माधुरी आयटम सॉंग करणार असून, पुन्हा तिचे लटकेझटके तिच्या चाहत्यांना बघण्यास मिळणार आहेत.
‘झलक दिखला जा’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये नुकतेच माधुरीने तिचे गुरु पं. बिरजू महाराज यांच्यासोबत डोळे दिपवणारी नृत्य जुगलबंदी सादर केली होती. ‘देढ इश्किया’ चित्रपटात ती मुजरा करणार असून, पं.बिरजू महाराज यांनी त्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. तसेच ती येत्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सिनेमाची शंभरी साजरी करताना तिच्या कारकिर्दीतील काही गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. तरुण आयटम गर्ल्सना माधुरी तगडे आव्हान देताना दिसत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-06-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit to do an item song in ram leela