धक धक गर्ल माधुरी दिक्षित ‘गुलाब गॅंग’ चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण करणार असून, लवकरच ती रणबिर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात आयटम सॉंग करणार आहे.
जवळपास तीन दोन दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी माधुरी दिक्षित इतक्या वर्षात पहिल्यांदाच आयटम सॉंगवर नाचणार आहे.
मात्र, गेले दशकभर चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर एखाद्या चांगल्या भूमिकेने पदार्पण करण्य़ाअगोदर माधुरीला आयटम सॉंग का करायचे आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
माधुरीने नुकतेच आपले पती श्रीराम नेने यांच्यासोबत ऑनलाईन डान्स अकॅडमी सुरू केली असून लवकरच तिच्या ‘देढ इश्किया’ या चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरूवात होणार आहे.
‘ये जवानी है दिवानी’चे दिग्दर्शन ‘वेक अप सिद’ फेम अयान मुखर्जीचे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमधील हॉट जोडी रणबिर आणि दिपीका पुन्हा एकदा एकत्र येणार असून हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा