आपल्या सुमधुर हास्याने अनेकांची हृदय जिंकणारी, नयन कटाक्षाने अनेकांना घायाळ करणारी आणि बॉलिवूडमध्ये धक-धक गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली माधुरी दिक्षित ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या प्रसिध्द शोच्या चित्रीकरणात सहभागी झाली होती. त्याबाबतचे पोस्ट आणि ‘कॉमेडी नाईट…’च्या सेटवरील कपिल शर्माबरोबरचे छायाचित्र तिने टि्वटरवर पोस्ट केले आहे. माधुरीच्या अभिनयाबरोबर तिच्या नृत्याचेदेखील अनेक चहाते आहेत. ‘एक, दो, तीन…’, ‘धक धक करने लगा…’ आणि ‘डोला रे डोला…’सारख्या अनेक गाण्यांवर माधुरीने आपली अप्रतीम नृत्य अदाकारी सादर केली आहे. तिने ‘डान्स विथ माधुरी’ नावाची ऑनलाईन डान्स अॅकॅडमी सुरू केली असून अॅकॅडमीच्या मोबाईल अॅपच्या प्रचारात सध्या ती व्यस्त आहे. याचाच एक भाग म्हणून ती कपिलच्या ‘कॉमेडी नाईट…’ कार्यक्रमात दिसणार आहे. माधुरीने याबाबतचे टि्वट प्रसिध्द केले असून, माधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आलेल्या या भागास तिने विनोद आणि नृत्याचा संगम असे संबोधिले आहे. त्याचप्रमाणे आपण कपिलचा डान्स बघण्यास उत्सुक असल्याचेदेखील म्हटले आहे. माधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आलेला ‘कॉमेडी नाईट…’ चा हा भाग २४ मेरोजी प्रसारीत होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2015 रोजी प्रकाशित
‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मध्ये माधुरी दिक्षित
आपल्या सुमधुर हास्याने अनेकांची हृदय जिंकणारी, नयन कटाक्षाने अनेकांना घायाळ करणारी आणि बॉलिवूडमध्ये धक-धक गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली...

First published on: 20-05-2015 at 12:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit to shake a leg on comedy nights with kapil