नुकतीच ‘रामलीला’ चित्रपटात माधुरी आयटम सॉंग करणार असल्याची चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे. त्यामुळे माधुरी आणि रणवीरच्या चाहत्यांना दोघांनाही एकत्र नृत्य करताना बघण्याची इच्छा पूर्ण होणार नाही. माधुरीने तिच्यापेक्षा खूप लहान असलेल्या रणबीरसोबत ‘जवानी है दिवानी’ चित्रपटात आयटम सॉंग केले होते.
माधुरी आणि रणवीरच्या आयटम सॉंगच्या बातमीस कशी सुरुवात झाली याची आम्हाला कल्पना नाही. रामलीलामध्ये आयटम सॉंगची गरज नाही. ‘मार डाला’ किंवा ‘काहे छेड छेड मोहे’ यांसारखे चांगले गाणे असेल तेव्हाच संजय लीला भन्साली हे माधुरीला नृत्य करण्यास सांगेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
चित्रपटात मुख्य भूमिका करणा-या दीपिका पादुकोणने ‘रामलीला’मध्ये गरबा नृत्य केले आहे. संजय लीला भन्सालीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा