माधुरीचा ‘देड इश्किया’ चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासोबतच तिच्या आगामी गुलाब गँग या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे माधुरीच्या चाहत्यांसाठी हा डबल धमाकाच असणार आहे.
सहारा मुव्ही आणि अनुभव सिन्हा निर्मित ‘गुलाब गँग’ चित्रपटाचे दिग्दर्शन सौमिक सेन याने केले आहे. यात माधुरी आणि जुही चावलाची प्रमुख भूमिका आहे. सामाजिक अन्यायाविरोधात संघर्ष करणाऱ्या ‘गुलाब गँग’ या महिला संघटनेपासून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माधुरीने महिलांसाठी लढणा-या सामाजिक कार्यकर्तीची भूमिका साकाली आहे. ‘गुलाब गँग’ ७मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader