एके काळी आपल्या दिलखेच अदाकारीने आणि ठुमकेबाज नृत्याने अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माधुरी दिक्षितची ही दिलखेच आदा कमी होत चालली असल्याचे जाणवते. लोकप्रिय टीव्ही डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ची पंच आणि बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दिक्षितच्या दिलखेच अदाकारील हळूहळू उतरती कळा लागली आहे. आपल्या नेहमीच्या नृत्यशैलीतून बाहेर पडत नवीन नृत्यप्रकार करण्याच्या माधुरीच्या प्रयत्नांना विशेष यश मिळाले नाही. ‘धूम मचाले’ गाण्यावरील बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा सुपर हीट डान्सवर माधुरीने सांबा नृत्यप्रकारात सादर करण्याचा प्रयत्न केला, जो प्रेक्षकांना बिलकूल आवडला नाही. आपल्या दिलखेच आदाकारीने प्रत्येक डान्स हीट करणाऱ्या मैाधुरीचा जलवा यावेळी फिका पडला.

Story img Loader