एखाद्या कलाकाराला मिळणारी प्रसिद्धी आणि त्याची लोकप्रिय ठरलेली भूमिका ही आनंददायक आणि सुखावणारी असली तरी त्यापाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात. दिवसाचे दहा ते पंधरा तास सलग चित्रीकरण करावे लागते. पण इतके करूनही प्रेक्षकांकडून मिळालेली पावती हे सर्व कष्ट विसरायला लावणारी असते. सोनी टीव्हीवरील ‘संकटमोचक महाबली हनुमान’या मालिकेत हनुमानाची भूमिका करणारे अभिनेते निर्भय वाधवा सध्या याचा अनुभव घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ही मालिका सोनी टीव्हीवरून प्रसारित होत आहे. ही मालिका आणि वाधवा यांचा ‘हनुमान’ लोकप्रियही झाला आहे. या मालिकेत ‘महाबली हनुमान’ विविध दागिने परिधान केलेला दाखविण्यात आला आहे. हनुमानाच्या अंगावर असलेले हे सर्व दागिने चार किलो वजनाचे असून प्रत्यक्ष चित्रीकरण आणि दरम्यानच्या वेळेतही वाधवा यांना हे चार किलो दागिने अंगावर घेऊन वावरावे लागत आहे. वाधवा यांची वेशभूषा फारशी वजनदार नाही. मात्र अंगावर इतके किलो वजनाचे दागिने घालून आणि रंगभूषा करून सुमारे १२ तास वाधवा हे अवघड आणि आव्हानात्मक काम करत आहेत. पण वाधवा यांनी हे आव्हान पेलले आहे.
‘महाबली हनुमाना’च्या अंगावर चार किलो दागिने
एखाद्या कलाकाराला मिळणारी प्रसिद्धी आणि त्याची लोकप्रिय ठरलेली भूमिका ही आनंददायक आणि सुखावणारी असली तरी त्यापाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात
First published on: 05-07-2015 at 12:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabali hanuman were four kg ornaments