एखाद्या कलाकाराला मिळणारी प्रसिद्धी आणि त्याची लोकप्रिय ठरलेली भूमिका ही आनंददायक आणि सुखावणारी असली तरी त्यापाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात. दिवसाचे दहा ते पंधरा तास सलग चित्रीकरण करावे लागते. पण इतके करूनही प्रेक्षकांकडून मिळालेली पावती हे सर्व कष्ट विसरायला लावणारी असते. सोनी टीव्हीवरील ‘संकटमोचक महाबली हनुमान’या मालिकेत हनुमानाची भूमिका करणारे अभिनेते निर्भय वाधवा सध्या याचा अनुभव घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ही मालिका सोनी टीव्हीवरून प्रसारित होत आहे. ही मालिका आणि वाधवा यांचा ‘हनुमान’ लोकप्रियही झाला आहे. या मालिकेत ‘महाबली हनुमान’ विविध दागिने परिधान केलेला दाखविण्यात आला आहे. हनुमानाच्या अंगावर असलेले हे सर्व दागिने चार किलो वजनाचे असून प्रत्यक्ष चित्रीकरण आणि दरम्यानच्या वेळेतही वाधवा यांना हे चार किलो दागिने अंगावर घेऊन वावरावे लागत आहे. वाधवा यांची वेशभूषा फारशी वजनदार नाही. मात्र अंगावर इतके किलो वजनाचे दागिने घालून आणि रंगभूषा करून सुमारे १२ तास वाधवा हे अवघड आणि आव्हानात्मक काम करत आहेत. पण वाधवा यांनी हे आव्हान पेलले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा