महाभारत या मालिकेने ८० ते ९० चे दशक गाजवले आहे. असे असले तरी देखील आज ही प्रेक्षकांना ही मालिका पाहायला नक्कीच आवडेल अस म्हणायला हरकत नाही. महाभारत या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. याच मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार हे सध्या आजारपणात आहेत. आजारपणात असताना सध्या त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे त्यांनी सांगितले आहे.
प्रवीण कुमार यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या आर्थिक अडचणीविषयी सांगितले. मी ७६ वर्षांचा आहे. काही काळापासून घरात आहे. माझी तब्येत ठीक नाही. खाण्यात सुद्धा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मणक्यांचा त्रास आहे. घरात माझी पत्नी वीना माझी काळजी घेते. एक मुलगी आहे तिचं मुंबईत लग्न झालं आहे.
आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…
७६ वर्षांचे प्रवीण आता बेरोजगार झाले आहेत. त्यांच्याकडे आता पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी सरकारकडून पेन्शनची मागणी केली आहे. अशा वेळी सगळे त्यांना विसरले आहेत आणि त्यांच्यासोबत कोणी नाही. प्रवीण यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.