सध्या लॉकडाउन असल्यामुळे घरात बसून लोकांना कंटाळा येऊ नये, त्यांच्या मनोरंजनाचे काही तरी साधन असावे म्हणून ८०च्या दशकातील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवण्यात आल्या. बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. या मालिकेतील ‘मैं समय हूं’ हा डायलॉग त्यावेळीही लोकप्रिय होता आणि आता ही असल्याचे दिसत आहे. पण या डायलॉगची निर्मिती झाली कशी? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता मालिकेतील एका पात्राने या डायलॉगचे रहस्य उलघडले आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘मैं समय हूं’ या डायलॉगची चर्चा सुरु आहे. महाभारतात हा डायलॉग आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आता महाभारतातील युधिष्ठिरची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी एका मुलाखतीमध्ये याचे उत्तर दिले आहे.
नुकताच ‘अमर उजाला’ने गजेंद्र चौहान यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाभारतातील अनेक किस्से सांगितले आहेत. दरम्यान त्यांनी मालिकेतील लोकप्रिय डायलॉग ‘मैं समय हूं’ची निर्मिती कशी झाली हे सांगितले आहे.
आणखी वाचा : खुशखबर! जुन्या मालिका पाहण्यासाठी दूरदर्शनने लाँच केला नवा चॅनेल
“महाभारताच्या सुरुवातीलाच ‘मैं समय हूं’ हा डायलॉग ऐकू येतो. खरतर हा डायलॉग ‘हम लोग’ मालिकेशी जोडलेला आहे. त्यावेळी या मालिकेचे अशोक कुमार नरेशन करत होते. पण बीआर चोपडा सरांनी महाभारताच्या नरेशनसाठी साउथचे एनटीआर सर यांच्याशी संवाद साधला होता. काही कारणास्तव त्यांना नकार देण्यात आला. त्यानंतर चोपडा सरांना कोणी तरी दिलीप कुमार नरेशसाठी योग्य आहेत असे सांगितले. त्यानंतर महाभारताचे नरेशन दिलीप कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार होते. पण चोपडा सरांनी त्यांना ही नकार दिला” असे गजेंद्र यांनी म्हटले.
आणखी वाचा : ‘या’ अभिनेत्रीने ओढावलेल्या परिस्थितीमुळे रामायणात केली होती मंदोदरीची भूमिका
“त्यानंतर डॉ. राही मासूम रजा साहेबावर महाभारताची जबाबदारी सोपवण्यात आली. ते दररोज सकाळी चोपडा सरांच्या ऑफिसमध्ये जायचे. पण दुपारचे जेवण करायला मात्र घरी जायचे. त्यांची पत्नी दररोज दीड वाजताचा अलार्म लावून ठेवायची. एक दिवस चुकन त्यांच्या पत्नीने दुपारच्या दीड वाजता ऐवजी रात्रीच्या दीड वाजताचा अलार्म लावला. अलार्म लावताच मासूम रजा साहेबांना जाग आली” असे गजेंद्र यांनी हसत म्हटले.
आणखी वाचा : 33 वर्षांनंतर अरुण गोविल यांनी शेअर केला रामायणाच्या संपूर्ण टीमचा फोटो
पुढे ते म्हणाले की, “रात्री दीड वाजता झोपेतून उठल्यानंतर त्यांना पुन्हा झोप आली नाही. ते उठून महाभारत लिहायला बसले. त्यावेळी त्यांनी सुरुवात ही वेळ खूप बलवान आहे असे लिहित केली. वेळ जर माझी झोप खराब करु शकतो तर कथा का नाही लिहू शकत असे त्यांनी म्हटले. त्यावर आणखी विचार करत त्यांनी ‘मैं हूं सम और में आज तुम्हे हस्तिनापूरकी कहानी सुनाने जा रहा हूं’ हा डायलॉग लिहिला. एका चुकीच्या अलार्ममुळे या डायलॉगची निर्मिती झाली.”