ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या महादेव बुक अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकारच्या लग्नात फेब्रुवारी महिन्यात सनी लिओनी, टायगर श्रॉफसह १४ सेलिब्रिटी पोहचले होते. या विवाह सोहळ्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी १४ चित्रपट कलाकार व गायकांनी हवालामार्फत रक्कम घेतली होती.
ईडीने याप्रकरणी मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने महादेव ऑनलाईन बेटींग ॲपशी सबंधित ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबईसह भोपाळ, कोलकाता परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ॲपचे प्रवर्तक असून या कारवाईमध्ये तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.
हे पण वाचा- महादेव ऑनलाइन सट्टा; छत्तीसगडच्या इंजिनिअरने दुबईतून पाच हजार कोटींचा घोटाळा कसा केला?
लग्नात कोण कोण सेलिब्रिटी होते?
१) आतिफ असलम
२) राहत फतेह अली खान
३) अली असगर
४) विशाल ददलानी
५) टायगर श्रॉफ
६) नेहा कक्कड
७) एली एवराम
८) भारती सिंह
९) सनी लिओन
१०) भाग्यश्री
११) पुलकित सम्राट
१२) कीर्ति खरबंदा
१३) नुसरत भरुचा
१४) कृष्ण अभिषेक
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते.