छोटया पडदयावरील रिअ‍ॅलिटी शो आणि त्यावरुन गाजणारे वादविवाद हा विषय महागुरुच्या माध्यमातून निर्माते संजय भुताडा यांनी प्रथमच रुपेरी पडदयावर हाताळला
चित्रपटाची संकल्पना निर्माते संजय भुताडा यांची असून प्राथमिक सुविधांच्या अभावासह कर्जबाजारीपणा असलेल्या एका साधारणशा खेडयात चित्रपटाची कथा घडते. टीव्हीवर महागुरु या रिअ‍ॅलिटी शोने लोकप्रियता गाठलेली असते. एसएमएस व्होटिंगनुसार या गावातल्या नायकाला त्या शोमध्ये एण्ट्री मिळते. आणि मग एका बंद घरातल्या रंगतदार खेळाला सुरुवात होते. यामध्ये कलाकार, उद्योजक, राजकारणी, सोशलवर्कर अशा वेगवेगळया क्षेत्रातले लोक एकत्र येतात. महागुरुची भूमिका अजिंक्य देव यांनी साकारली असून मध्यवर्ती भूमिकेत उपेंद्र लिमये दिसणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे गॅलिना वासलोना या जर्मन अभिनेत्रीने यात भूमिका केली असून तिच्या वाटयाला आलेले बरचसे संवाद तिने स्वतः मराठीत बोलले आहेत.
चित्रपटाला पाश्र्वसंगीत मिलिंद जोशी यांनी दिले असून शंकर महादेवन, निहिरा जोशीने यात पाश्र्वगायन केले आहे. उपेंद्र लिमये, अजिंक्य देव यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार, उदय सबनीस,मिलिंद शिंदे, दीपक करंजीकर, सुनील तावडे, अश्विनी एकबोटे, स्मिता तांबे, गॅलिना वासलोना, कमलेश सावंत यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. महागुरुह २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

Story img Loader