मराठी नाटक हे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यामागे अनेक दिग्गजांचे योगदान आहे. आज मराठी नाटकांना शंभरहून अधिकवर्ष झाली आहेत. मात्र आजही ओटीटीच्या जमान्यात नाटक बघण्यासाठी प्रेक्षक येत असतात. आज रंगभूमीच्या निमिताने सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका मोठी घोषणा केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर मध्ये म्हंटल आहे की ‘महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह उत्तम व्हावी, यामधील सुविधा परिपूर्ण व्हाव्यात यासाठी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योजना करण्याचा निर्णय आज सह्याद्री अतिथीगृह येथील आयोजित बैठकीत घेतला.’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. त्यांचा हा निर्णयावर कलाविश्वात नक्कीच एक आनंदाची बातमी म्हणता येईल.
Photos : मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ऋतुजा बागवेने ‘अनन्या’ नाटकातील आठवणींना दिला उजाळा!
नाट्यगृहांबद्दल नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार उघड्पणे बोलत असतात. आज महाराष्ट्रात प्रमुख शहरांच्या व्यतिरिक्त इतर शहरातदेखील नाट्यगृह आहेत. मात्र त्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही. प्रशांत दामले, भरत जाधव यांसारखे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहातील अडचणींबद्दल आपले मत व्यक्त करत असतात.
आज करोनाकाळानंतर नाट्यसृष्टी पुन्हा उभारत आहे. सध्या रंगभूमीवर अनेक नाटकं येत आहेत. काही जुनी नाटके पुन्हा एकदा नव्या रूपात येत आहेत. तसेच येत्या काही काळात दर्जेदार नाटकांसाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.