सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गेले अनेक दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकरांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठीमधील कलाकारांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेल्या अभिनेता गौरव मोरे, सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. नुकतंच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर राजू श्रीवास्तव यांचा फोटो शेअर केला आहे. ‘आम्ही तुम्हाला मिस करू सर’ असा कॅप्शनदेखील त्याने दिला आहे. तसेच इटाईम्सला आपली प्रतिक्रिया देताना तो असं म्हणाला की, ‘मी बातमी ऐकल्यापासून मी खरोखरच अस्वस्थ आणि निराश झालो आहे. आधी माझा विश्वास बसत नव्हता कारण त्यांच्या निधनाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र ही बातमी खरी आहे हे समजताच मी खूप दुःखी झालो’. तो पुढे म्हणाला की, ‘राजू सर हे माझे आदर्श होते. त्यांनी आपल्या विनोदाच नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राजू सर एका साध्या कुटुंबातून आले होते. मात्र आपल्या अंगातील कलागुणांनी ते मोठे झाले. पुढील २५ वर्षात त्यांच्यासारखा कलाकार होणार नाही. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. त्यांचे कार्यक्रम पाहून अनेकजण तणावातून बाहेर आलेले आहेत’.

“लोक मला अमिताभ बच्चन म्हणून… ” विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी सांगितला होता ‘तो’ किस्सा

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ यासारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी आपले मनोरंजन केले आहे. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते.

राजू श्रीवास्तव अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते होते. करियरच्या सुरवातीला ते विनोदी कार्यक्रम करताना अमिताभ बच्चन यांची नक्कल करायचे. त्याचबरोबरीने दिलीप कुमार शशी कपूर यांची नक्कलदेखील ते करायचे. बॉलिवूडमधील कलाकारांच्या बरोबरीने लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या राजकारणी लोकांच्या नकलादेखील त्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharahstrachi hasyajatra artist gaurav more mourns raju srivastavas death spg