‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. येत्या आठवड्यात खास रसिकांसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – दे धक्का २ हा विशेष कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ १५ ऑगस्टपासून पुन्हा सुरु होत आहे. दर आठवड्यातील चार दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. पण येत्या आठवड्यात खास रसिकांसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- दे धक्का २ विशेष हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी येत आहे. दे धक्का २ या चित्रपटाची संपूर्ण टीम हास्यजत्रेच्या मंचावर येणार आहे. त्यामुळे दर्जेदार विनोद, नृत्ये आणि गाणी असं सगळं रसिकांना बघायला मिळणार आहे.

Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर खुद्द निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर येणार आहेत. प्रेक्षकांना अनेक लोकप्रिय चित्रपट देणारे महेश मांजरेकर हास्यजत्रेच्या मंचावर हास्यरसिकांना मनापासून दाद देताना आणि खळखळून हसताना पाहायला मिळतील. त्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे यांचीही उपस्थिती या मंचावर असणार आहे.

मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात काम केले आहे. त्यामुळे त्यांचं हास्यवीरांबरोबरचं काम बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. याबरोबरच मेधा मांजरेकर, गौरी इंगावले, सक्षम कुलकर्णी, अमेय खोपकर हे कलाकारही हास्याच्या मंचावर उपस्थित राहून खळखळून हसणार आहेत.

Video: लंडन दौरा, १२ अंडी, शॉपिंग अन् बरंच काही… ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर दिलखुलास गप्पा

आम्ही हास्यजत्रा आवर्जुन बघतो. आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो. या कार्यक्रमातील सगळी पात्रं आमची लाडकी आहेत, असे महेश मांजरेकरांनी या कार्यक्रमात सांगितलं. ‘दे धक्का’ ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दे धक्का २ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra hasyajatra special show for de dhakka 2 marathi movie promo video viral nrp