राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासूनच सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असतानाच आता सिने निर्माता विभु अग्रवाल विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विभु अग्रवालवर एका महिलेने शारिरिक शोषण केल्याचा आरोप केलाय.
उल्लू डिजीटल नावाने विभु कंपनी चालवत होता. या कंपनीची कंट्री हेट असलेल्या अंजली रैना विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त एएनआय वृत्त संस्थेने दिलंय. उल्लू डिजीटल कंपनी अडल्ड सिनेमा बनवण्यासाठी ओळखली जाते. उल्लू अॅप अश्लील कंटेटसाठी ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विभुने उल्लूवरील कंटेंट बदलण्याचं म्हंटलं होतं.
Maharashtra | Police have registered a case against Vibhu Agrawal, the CEO of film production company Ullu Digital Pvt Ltd for allegedly sexually harassing a woman, under Section 354 of IPC in Mumbai. Anjali Raina, the company’s country head has also been booked: Mumbai Police
— ANI (@ANI) August 5, 2021
या मुलाखतीत विभु म्हणाला होता “आम्ही उल्लूबद्दल लोकांच्या मनात असलेली भावना बदलण्याचा विचार करतोय. त्यामुळे या अॅपवर असलेला ६० टक्के कंकेट आम्ही बदलून साधारण कुटुंबिय पाहू शकतील असा कंटेट आणणार आहोत. कारण जेव्हा केव्हा उल्लू हे नाव घेतलं जातं तेव्हा लोकांच्या मनात केवळ अश्लील फिल्म हाच विचार येतो. आमचं देखील कुटुंब आहे त्यामुळे आम्ही हे बदलू इच्छितो.” असं विभु म्हणाला होता.
या वेळी आपण अशा सिनेमांसाठी कुणावरही दबाव टाकत नसल्याचं विभु म्हणाला होता. तर एखाद्याने काम करण्यास वकार दिला तर इतर चारजण काम करण्यासाठी तयार असतात असं देखील तो म्हणाला.