आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री विशाखा सुभेदारला ओळखले जाते. अवघ्या महिनाभरापूर्वी विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातून निरोप घेतल्याचे तिने सांगितले होते. यानंतर ती पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. नुकतंच यामागचे उत्तर समोर आले आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विशाखाने CID मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही लवकरच एका मराठी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. विशाखाने हा फोटो शेअर करत दयानंद शेट्टीसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!

विशाखाने दयानंद शेट्टीसोबतचा फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “तोड दो ये दरवाजा, दया…#shoot #onset #setlife” असे तिने म्हटले आहे. तिच्या या फोटोत ते दोघेही एकत्र दिसत आहे. तसेच विशाखाच्या चेहऱ्यावर नवीन गोष्टी करतानाचा आनंद दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेती अभिनेत्री सोनालिका जोशी म्हणजे माधवीने तिच्या या फोटोवर कमेंट करत “अभिनंदन” असे म्हटले आहे. तर तिच्यासोबत काम केलेल्या अभिनेता समीर चौगुले यांनी मस्तच अशी प्रतिक्रिया दिली आहे.

CID मधील दयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं

दरम्यान CID या मालिकेतून प्रसिद्धझोतात आलेला अभिनेता म्हणून दयानंद शेट्टीला ओळखले जाते. दयानंद शेट्टी याने या CID या मालिकेत दयाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील ‘दया दरवाजा तोड दो’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेतील दया हा लवकरच एका चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.

नुकतंच मुहूर्त झालेल्या या चित्रपटाचे नाव ‘गरम किटली’ असे आहे. हा एक मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली ‘गरम किटली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात दयासोबत आदित्य पैठणकर आणि श्रद्धा महाजन ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबच विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील अशी तगडी स्टारकास्टही या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader