महाराष्ट्राला पोट धरुन हसवणा-या सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि त्यामधील विनोद अतिशय चलाखीने सादर करणारे कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. रोजच्या व्यापातून प्रेक्षकांना थोडासा आराम मिळावा यासाठी बुधवारी आणि गुरुवारी सोनीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या २६ आणि २७ डिसेंबरला रंगणार आहे.

या कार्यक्रमासाठी कलाकारांची केलेली निवड ही अचूक होती. कारण या कलाकारांनी प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, त्यांना हसवले आहे. कॉमेडी रिऍलिटी शो असणा-या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये स्पर्धकांच्या चार टीम नेमण्यात आल्या होत्या. विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे आणि समीर चौघुले हे चार विनोदवीर त्या चार टीमचे प्रमुख आहेत. ‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब मिळवण्यासाठी या चारही टीमने एकापेक्षा एक मजेशीर आणि अफलातून सादरीकरण केले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे या शोचे परिक्षक असून त्यांनीही कलाकारांना दरवेळी दिलखुलापसपणे दाद दिली आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

अशा या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टीमला आणि मनोरंजनाच्या एका तासाला निरोप देण्याची वेळ आली असली तरी या हास्यजत्रेचं दुसरं पर्व देखील लवकरच येणार आहे. या पर्वातील विजेत्या जोडीला दुस-या पर्वात डायरेक्ट संधी मिळणार असून त्यातील बाकी कलाकार मात्र गुलदस्त्यात आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये ‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब कोण मिळवणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असून अंतिम निकाल पाहण्यासाठी ‘तास भर बसा आणि पोटभर हसा’ असं म्हणणा-या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अंतिम सोहळा पाहण्यासाठी २६ आणि २७ डिसेंबरला रात्री ९ वाजता सोनी मराठी पाहावे लागणार आहे.

Story img Loader