छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता हास्यपंचमी साजरी करतो आहे.
आठवड्यातले पाचही दिवस हा कार्यक्रम हास्यरसिकांना बघायला मिळतो आहे. ह्या आठवड्यात रसिकांचं मनोरंजन वाढणार आहे. कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर SonyLivवरील ‘Pet पुराण’ या सीरिजचा चमू येणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि ऋषी मनोहर यांचं स्कीट रसिकांना बघायला मिळणार आहे.
आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?
आणखी वाचा : एआर रहमानची लेक खतीजाचा झाला निकाह, पाहा फोटो
‘Pet पुराण’ या सीरिजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आणि हे असं असताना या सीरिजचा चमू हास्यजत्रेत येणं ही सईसाठी आणि हास्यरसिकांसाठी पर्वणी असेल. हा विशेष भाग हास्यरसिकांना आज म्हणजे शुक्रवारी पाहता येणार आहे. सीरिजचा विषय वेगळा पण प्रेक्षकांना आवडणारा असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. मालिकेचा संपूर्ण चमू काय धम्माल करणार, ललित आणि ऋषी यांच्याकडून लोकांना काय बघायला मिळणार हे जाणून घेण्याची आतुरता लागली आहे. हे जाणून घेण्यासाठी हास्यजत्रा पाहत राहा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोम.-शुक्र., रात्री ९वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.