‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. समीर चौगुले याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतंच त्याला एका चाहत्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे.
समीर चौगुले याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्याने दिलेल्या एका खास गिफ्टबद्दल भाष्य केले आहे. यात त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या चाहत्याने त्याची हुबेहुब रांगोळी काढली आहे. या रांगोळीत एका बाजूला समीर चौगुले आणि दुसऱ्या बाजूला विनोदवीर चार्ली चॅप्लिन दिसत आहे. मदन कावळे या कलाकाराने ही रांगोळी काढली आहे. यात त्याने समीर चौगुले यांना चार्ली चॅप्लिनचा दर्जा दिला आहे. ही रांगोळी पाहिल्यानंतर समीर चौगुले भावूक झाले.
आणखी वाचा : ‘तिने माझी फसवणूक केली’, मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षितचे संबंध बिघडण्याचं कारण आलं समोर
त्यांनी इंस्टाग्रामवर या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना ते म्हणाले, ‘चाहत्यांचे प्रेम हीच खरी ऊर्जा असते. गोरेगाव येथे रांगोळी प्रदर्शनात श्री. मदन कावळे यांनी माझी अतिशय सुंदर रांगोळी काढली…मनापासून आभार आणि प्रेम.’ ही रांगोळी पाहून समीर यांचे चाहते देखील फार आनंदी झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “तू या क्षणी जिथे असशील तिथे…”, समीर चौगुलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान अभिनेते समीर चौगुले हे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. याच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.