‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातून प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, ओंकार राऊत यांसारखे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनयाबरोबरच वनिता खरातने काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याबरोबर ‘सुमीतवनी’ नावाचे युट्यूब चॅनेल सुरु केले होते. यावर वनिता तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते.
हेही वाचा : “Happy Anniversary मालकीण!”, अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट
अलीकडेच वनिता खरातने तिच्या युट्यूब चॅनेलवर ‘प्रियदर्शनी इंदलकरच्या गावच्या शेताची सफर’ असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, ओंकार राऊत हे कलाकार आणि यांच्यासह वनिताचा नवरा सुमीत लोंढे नुकतेच फिरायला मुंबईबाहेर प्रियदर्शनीच्या गावी गेले होते.
हेही वाचा : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर शरद पोंक्षेंनी मांडले परखड मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “शब्द आज वारले”
प्रियदर्शनीच्या गावी गेल्यावर या कलाकारांनी रानात फेरफटका मारला, शेतात जाऊन शेंगा काढल्या एकंदर संपूर्ण ट्रिपमध्ये सर्वांनी मजा केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्रिदर्शनीच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण जागेत डाळिंब, आंबा, शेंगा अशी विविध झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे प्रियदर्शनीच्या वडिलांनी त्यांच्या घरातून खंडोबाचे मंदिर कसे दिसते हे सुद्धा प्रेक्षकांना दाखवले. “हास्यजत्रेतील इतर कलाकारांना कामानिमित्त वेळ नसल्याने सर्वांना प्रियाच्या गावी येणे शक्य झाले नाही, आम्ही लवकरच एकत्र भेटू…” असे वनिताने या व्हिडीओमध्ये सांगितले.
व्हिडीओच्या शेवटी “तुम्ही सुद्धा प्रियदर्शनीच्या मधुबन फार्म्सला भेट द्या” असे आवाहन वनिता खरातने सगळ्या प्रेक्षकांना केले आहे. दरम्यान, वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्यांच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत असून बहुतांश युजर्सनी “महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो लवकरात लवकर सुरु करा, आम्ही आतुरतेने वाट पाहतोय…” अशा कमेंट केल्या आहेत.