लोकप्रिय अभिनेता ओंकार भोजने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरांत पोहोचला. विनोदबुद्धी आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी कलाविश्वात अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोप्रमाणेच त्याने चित्रपटातूनही अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला.

ओंकार भोजनेने ‘गर्ल्स’, ‘बॉईज २’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. ‘बॉईज २’ मध्ये त्याने साकारलेली नारूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘बॉईज ३’मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी ओंकारच्या आणखी एका मराठी चित्रपटाची मेजवानी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

हेही वाचा >> नंदुरबारमधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावरून हेमंत ढोमे संतापला, म्हणाला “आपले आदिवासी विकासमंत्री…”

‘रूप नगर के चीते’ हा मराठी चित्रपटदेखील येत्या १६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. दोन मित्रांच्या मैत्रीच्या प्रवासाची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता करण परब आणि कुणाल शुक्ला मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता सुयश टिळकची पत्नी आणि अभिनेत्री आयुषी टिळकही या चित्रपटात झळकणार आहे. विहान सुर्यवंशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एकाच दिवशी ओंकार भोजनेचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहतेही खुश आहेत.

हेही वाचा >> विकी-कतरिना पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर; शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

हेही वाचा >> ‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओकची मोठी घोषणा; ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांना घेऊन नव्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार

कॉमेडी किंग अशी ओळख असलेल्या ओंकारने ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’, ‘तुमच्यासाठी काही पण’, ‘ एकदम कडक’ या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सध्या ओंकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. या कार्यक्रमात तो वेगवेगळी पात्र साकारून अभिनयातून विनोदनिर्मिती करत असतो. कित्येकदा त्याच्या पाठीवर कौतुकाची थापही मिळत असते.

Story img Loader