छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कडे पाहिलं जातं. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या विविध कलाकारांची नाव समोर येत आहेत. यंदा बिग बॉसचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत असून ते सध्या चांगलेच चर्चेत आहे. नुकतंच महेश मांजरेकर यांनी मला सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडे यांना बिग बॉसमध्ये सहभागी झालेलं बघायला आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब हिने प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर हे चांगलेच चर्चेत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामध्ये ती यशस्वी ठरली. या कार्यक्रमामध्ये ती एकापेक्षा एक अतरंगी पात्र साकारताना दिसते. तिच्या विनोदाने आता सगळ्यांना भूरळ घातली आहे. शिवाली उत्तम विनोदी कलाकार तर आहेच. पण त्याचबरोबर तिचा प्रत्येक लूकही प्रेक्षकांना आवडतो.
हेही पाहा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

नुकतंच शिवाली परबला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी तिला महेश मांजरेकरांच्या वक्तव्याबद्दलही विचारण्यात आले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी महेश मांजरेकरांसारखे दिग्गज माझं नाव घेत असतील तर हे आश्चर्यकारक आहे. मी पूर्णपणे नि:शब्द आहे. मी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून जाईन की नाही, कधी जाईन याबद्दल मी अद्याप विचार केलेला नाही.”

“यंदाच्या पर्वासाठी मला विचारणा झालेली नाही. पण जर भविष्यात मला विचारणा झाली तर नक्कीच मला ‘बिग बॉस’मध्ये सहभागी व्हायला आवडेल. मी बिग बॉस प्रेमी नाही. पण मला नवीन काहीतरी करायला नक्कीच आवडेल. बिग बॉसच्या घरात माझ्यासोबत गौरव मोरे आणि चेतना भट्ट यांच्यासह हास्यजत्रेतील कोणतेही कलाकार सहभागी होणार असतील तरीही मला आवडेल”, असेही शिवाली म्हणाली.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकर म्हणाले “गौरव मोरे, शिवाली…”

दरम्यान बिग बॉस मध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी होणार आहे. यंदा या कार्यक्रमाची थीम ALL IS WELL अशी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader