‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. नम्रता एकापेक्षा एक सुंदर पात्र या कार्यक्रमाध्ये साकारताना दिसते. अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पण आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिला कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली. याबाबत तिनेच इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं आहे. लग्नानंतरही काम करणं तिच्यासाठी फार अवघड का नव्हतं? याचाही नम्रताने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा

आज अभिनेत्री म्हणून मिळालेल्या यशाचं श्रेय नम्रता तिच्या आईला तसेच सासूला देते. ती म्हणते, “माझी आई माझ्या आयुष्यामधील दुर्गा आहे. आज मी तुमचं मनोरंजन करत आहे याचं भाग्य मला माझ्या आईमुळे मिळालं. तिचा मला पाठिंबा मिळाला नसता तर मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसले नसते. आज मी या क्षेत्रामध्ये जे काही मिळवलं आहे त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे.”

आपल्या सासूबाईंबाबत नम्रता म्हणाली, “माझ्या आयुष्यातील दुसरी दुर्गा म्हणजे माझ्या सासूबाई. लग्नानंतर मुलींना बरंच टेन्शन असतं. आपल्या सासरकडची मंडळी आपल्या सांभाळून घेतील की नाही?, आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करण्यास आपल्याला पाठिंबा मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात असतात. पण माझं हे टेन्शन अगदी दूर झालं. कारण मला माझ्या सासूबाईंनी पूर्णपणे पाठिंबा दिला.”

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

“गरोदरपणात मी जवळपास सात महिने काम केलं. हे फक्त सासूबाईंमुळे शक्य झालं. माझा मुलगा रुद्राज झाल्यानंतरही तू पुढच्या सहा महिन्यामध्ये पुन्हा कामाला जायचं असं त्यांनी मला सांगितलं होतं. मुलाचं टेन्शन घेऊ नको त्याला आम्ही सांभाळू. तू नीट काम कर असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं. त्यांचा हाच पाठिंबा मिळाला आणि मी काम करू शकले.” नम्रताला तिच्या सासरच्या मंडळींनी कलाक्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम पाठिंबा दिला असल्याचं तिच्या बोलण्यामधून दिसून येतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem actress namrata sambherao talk about her mother in law says she is very supportive watch video kmd
Show comments