अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता देवदर्शन करत आहे.
आणखी वाचा – Video : मध्यरात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली शहनाज गिल, व्हिडीओ व्हायरल झाला अन्…
प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या टीमसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यादरम्यानचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. त्यानंतर ती बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिरामध्ये पोहोचली. प्राजक्ताला देवदर्शनाचं वेड लागलं असल्याचं यावरुन स्पष्टपणे दिसून येत आहे. तिने या मंदिरामधील काही फोटो शेअर केले आहेत.
“सोमवारी, १२ जोतीर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथचे सुंदर दर्शन लाभले. माझ्या पायाला बांधलाय भवरा. होय…सध्या खूपच प्रवास करत आहे. करोनानंतर सुरू झालेल्या उत्सवांचा आनंद मी लुटत आहे.” असं प्राजक्ताने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ता देवासमोर हात जोडताना दिसत आहे. तसंच शंकराच्या पिंडीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीच्या पतीची छोट्या पडद्यावर एण्ट्री?, ‘या’ शोमध्ये होणार सहभागी
परळी वैजनाथाच्या दर्शनाला जाताना प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिला पाहण्यासाठी मंदिराच्या परिसरामध्ये लोकांनी गर्दी केली. याआधीही प्राजक्ता श्रावणी सोमवारनिमित्त सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे गेली होती. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ती तिथवर पोहोचली. दरवर्षी प्राजक्ताचे कुटुंबीय श्रावणामध्ये या मंदिरात येतात. महादेवाचं दर्शन घेतात. ही आमच्या घराची परंपरा आहे असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.