सौंदर्याची परिभाषा ही रंग, रुप किंवा देहरचनेवर आधारित नसते हे अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिने सिद्ध केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून वनिता प्रेक्षकांना खळखळून हसवते. या कार्यक्रमामुळेच ती नावारुपाला आली. वनिताच्या विनोदाचा अचूक टायमिंग तर कमालीचा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेट सहकलाकारांबरोबर वनिता धमाल-मस्ती करताना दिसते. आता याच सेटवरील तिचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

१९ जुलैला वनिताचा वाढदिवस होता. यानिमित्त तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तिचा सहकलाकार प्रसाद खांडेकर वनिताचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये वनिता कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान झोपताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

प्रसादने वनिताचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “जादूचा व्हिडीओ. हा व्हिडीओ सुरु केला की तुम्ही ‘वने’ अशी जोरात हाक मारा. मग जादू होईल. वनी तुमच्याकडे बघेल मग तिला बर्थडे विश करा. आज आमच्या वनीचा म्हणजेच बबड्याचा वाढदिवस आहे. आमच्या सेट वरील सगळ्यांची लाडकी, सगळ्यांकडे हक्काने हट्ट करून स्वतःचे लाड पुरवून घेणारी वनी. वने तुला आयुष्यात जे जे हवं ते ते सगळं तुला मिळो.”

आणखी वाचा – हृतिक रोशन दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? घटस्फोटानंतर ८ वर्षांनी गर्लफ्रेंडशी करणार लग्न

प्रसाद खांडेकरबरोबरच समिर चौघुलेने देखील वनिताबरोबरचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वनिताने ‘कबीर सिंग’ सारख्या हिंदी चित्रपटामध्ये काम करत अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केलं. अजूनही ती नवीन भूमिका करण्यासाठी धडपड करत आहे.

Story img Loader