‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे प्रकाशझोतात आला. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वामध्येही गौरव धम्माल करत आहे. तो या कार्यक्रमापुरतीच मर्यादीत राहिला नाही. त्याचा नवा मराठी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ‘हवाहवाई’ या मराठी चित्रपटामध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसेल. पण आता गौरवला जाहिरातींच्या ऑफर देखील येऊ लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरवच्या हाती आता नवनवीन काम येऊ लागलं आहे. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त आता त्याने जाहिरात क्षेत्रामध्येही पदार्पण केलं आहे. एका जाहिरातीचं चित्रीकरण गौरवने पूर्ण केलं आहे. या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यानचे काही व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या जाहिरातीमध्ये गौरव बॉलिवूड अभिनेता शाम मशालकरबरोबर काम करताना दिसेल. शामनेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे गौरवबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करत त्याचं कौतुक देखील केलं आहे. शामने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जाहिरातीमध्ये काम करणारे इतर कलाकार दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : …अन् ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला पाहून चाहतीला अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

“अप्रतिम, सुंदर मनाचा व्यक्ती आणि खूप चांगला अभिनेता गौरव मोरेबरोबर जाहिरातीचं चित्रीकरण करत आहे.” असं शामने गौरवबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी देखील गौरवचं तोंडभरून कौतुक करत आहेत. अशीच प्रगती करत राहा, उत्तम अभिनेता अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem gaurav more work in advertisement shooting photos video viral on social media kmd