‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील दोन तगडे विनोदी कलाकार म्हणजे नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर. नम्रात-प्रसादने आजवर आपल्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. नम्रता साकारत असलेली लॉली तर कमालीची आहे. तसेच प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साकारत असलेलं प्रत्येक विनोदी पात्र प्रेक्षकांना हवहवसं वाटतं. नम्रता-प्रसादची जोडी तर कमालीची हिट आहे. आता या दोघांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ऑनस्क्रिन नम्रता-प्रसाद धमाल-मस्ती करताना दिसतात. पण खऱ्या आयुष्यातही या दोघांमधील नातं कमालीचं आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे नम्रता-प्रसादचा डान्स व्हिडीओ. आपल्या कामामधून वेळ मिळताच ही कलाकार मंडळी रिल व्हिडीओ तयार करतात. या दोघांनी चक्क ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटबाहेर रस्त्यावरच धम्माल डान्स केला आहे.
पाहा व्हिडीओ
“प्यार मेरा प्यार तेरा…” या गाण्यावर नम्रता-प्रसादने डान्स केला आहे. दोघांनीही काळ्या रंगाचं टि-शर्ट, डोक्यावर टोपी घालत या सुपरहिट गाण्यावर धमाल डान्स स्टेप्स केल्या. त्यांच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी बरीच पसंती दिली आहे. तसेच याआधी आपण नम्रताला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर नाचताना पाहिलं आहे.
आणखी वाचा – Video : जाहिरातीमधील ‘ती’ तीन सेकंद अन् रातोरात प्रसिद्ध झाली होती ऐश्वर्या राय, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
पहिल्यांदाच या रिल व्हिडीओमध्ये प्रसाद इतका उत्तम डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही कमेंटच्या माध्यमातून नम्रतासह त्याच्या नृत्याचंही कौतुक केलं आहे. त्याचबरोबरीने दोघांचा डान्स करतानाचा स्वॅग विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे.