‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. या कार्यक्रमाने काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा एका नव्या अंदाजामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमामधील मोजके कलाकार काही दिवसांपूर्वी नागपूरकरांच्या भेटीला आले होते. यामध्ये अभिनेता समीर चौगुलेचा देखील समावेश होता. यावेळी ते विदर्भातील कलाकारांबाबत बोलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – ‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरला अन्…; हैद्राबादमधील चित्रपटगृहामध्ये पोहोचताच विजय देवरकोंडाचे डोळे पाणावले

समीर चौगुलेसह पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे कलाकार नागपूरला आले होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं कौतुक केलं. नागपूरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात काम करणाऱ्या विदर्भातील कलाकारांबाबत समीर चौगुलेला विचारण्यात आलं.

यावेळी तो म्हणाला, “आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये विदर्भातील दोन ते तीन कलाकार आहेत. हे दोन ते तीन कलाकार कधी सेटवर नसतील तर जेवणात मीठ नसलं की आपल्याला कसं वाटतं तसंच आम्हाला वाटतं. विदर्भामधील भाषा म्हणजे हास्यजत्रेचं मीठ आहे. या भाषेशिवाय चव नाही. विदर्भातील भाषेला स्वतःचा एक झटका आहे. विदर्भातल्या भाषेमध्येच विनोद दडलेला आहे.

आणखी वाचा – केआरकेला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

“विदर्भातील भाषा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नसेल तर हा कार्यक्रमच अपूर्ण असेल. सचिन मोटे, सचिन गोस्वामी या दोघांचाही आग्रह असतो की तुम्ही तुमच्या मातीतील भाषा सोडू नका. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही स्किट करा. आम्ही आज प्रत्येक प्रेक्षकाची भाषा बोलतो म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सर्वत्र प्रसिद्ध आहे. विदर्भातील भाषेमध्येच गोडवा आहे.” समीर चौगुलेने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये आपंल मत मांडलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem samir choughule talk about vidharbha actors watch video kmd
Show comments