‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकाराने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सोनी मराठी वाहिनीवरील हा कार्यक्रम प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतो. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आवर्जुन पाहतात. या कार्यक्रमामधील सुप्रसिद्ध कलाकारांमधील एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसादच्या विनोदाचा टायमिंग तर कमालीचा आहे. प्रसाद आता हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे.
आणखी वाचा – “कंगना रणौतबरोबर काम करणंच माझी मोठी चूक”; सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
प्रसादने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे आपली हिंदी वेबसीरिज प्रदर्शित झाली असल्याचं त्याने सांगितलं आहे. प्रसाद म्हणाला, “माझी नवीन हिंदी वेबसीरिज ‘मिया बिवी और मर्डर’ १ जुलैपासून एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे. ही वेबसीरिज नक्की बघा आणि मला प्रतिक्रिया नक्की कळवा.” प्रसादने या वेबसीरिजमधील कलाकाराबरोबर देखील एक फोटो शेअर केला आहे.
‘मिया बिवी और मर्डर’ वेबसीरिजमध्ये राजीव खंडेलवाल, मंजीर फडणीस, रुशद राणा आदी कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत. प्रसादने राजीव खंडेलवालबरोबर फोटो शेअर केले आहे. तसेच प्रसादचं नेटकऱ्यांसह अभिनेता प्रसाद ओकने देखील अभिनंदन केलं आहे. करोनामुळे या वेबसीरिजचं काम रखडलं होतं. अखेरीस ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.
आणखी वाचा – “हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं”; एकनाथ शिंदे यांच्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांची खास पोस्ट
ही वेबसीरिज वैवाहिक जीवनावर आधारित आहे. प्रसादने या वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. प्रसादने मराठी नाटक, चित्रपटांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना भेटत असतो. शिवाय काही काळासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु होत आहे.