भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या प्रोडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. धोनी एंटरटेनमेंट निर्मित ‘एलजीएम’ (LGM) म्हणजेच ‘लेट्स गेट मॅरिड’ असं या चित्रपटाचं नाव आहे. काल एमएस धोनीच्या हस्ते चेन्नईत या चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑडिओ लाँच सोहळा पार पडला. यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि किक्रेटपटू दीपक चहर उपस्थित होते.

‘लेट्स गेट मॅरिड’ या चित्रपटाची कहाणी गौतम व मीरा या पात्रांभोवती फिरणारी आहे. गौतम व मीराचे एकमेकांवर खूप प्रेम असते. त्यामुळे दोघं लग्न करायचं ठरवतात, पण लग्नानंतर मीराला गौतमच्या आईबरोबर राहण्याची इच्छा नसते; त्यामुळे गौतम एक ट्रिप प्लॅन करतो. जेणेकरून त्याच्या आईचं आणि मीराचं नातं घट्ट होईल, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Music release of the movie Naad in the presence of Prasad Oak
प्रसाद ओकच्या उपस्थितीत ‘नाद’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

हेही वाचा – ओटीटीवर पदार्पण करणारी नर्गिस फाखरी चर्चेत; म्हणाली, “मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न…”

धोनीचा ‘एलजीएम’ हा तमिळ चित्रपट आहे. रमेश थमिलामानी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनेता हरीश कल्याण, नादिया आणि इवाना ‘एलजीएम’मध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – अभिनेते गिरीश कुलकर्णी सोशल मीडियाचा वापर का करत नाहीत? म्हणाले, “फॉलो…”

दरम्यान, धोनी प्रोडक्शनचा हा पहिला वहिला चित्रपट ३१ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेंद्रसिंग धोनी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. एप्रिल २०२३ मध्ये ‘एलएजीएम’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, तेव्हा धोनी म्हणाला होता की, “हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद देईल. ‘एलजीएम’ एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे, जो सगळ्यांना आवडेल.’