भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनी यांची कन्या झिवा किती गोंडस आहे हे वेगळे काही सांगायला नको. तर या चिमुरड्या झिवाने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगलाचं चक्क चॅलेंज केले आहे.
साक्षी धोनीने तसे ट्विट केले आहे. #HitTheQuanChallenge च्या व्हिडिओवर चिमुरड्या झिवाने दिलेल्या प्रतिसादाचा व्हिडिओ साक्षीने ट्विट केला आहे. एका ट्विटमध्ये रणवीर तुला झिवाचे हे चॅलेंज आहे असेही साक्षीने म्हटलयं. आता झिवाचे चॅलेंज रणवीर पूर्ण करतो की नाही ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण, बँग बँग आणि आय टू आय यांवर रणवीरने जे खोडकर उत्तर दिले होते ते अजिबात विसरण्यासारखे नाही.