दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. महेश बाबू आणि नम्रताच्या आयुष्यातील आज सर्वात मोठा दिवस आहे. नम्रताने स्वत: याबद्दलचा खुलासा केला आहे.

महेशबाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने महेश बाबू आणि तिचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : “महेश आयुष्यात आला आणि…” अखेर नम्रता शिरोडकरने सांगितले चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण

नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या हा फोटो फार जुना आहे. या फोटोत नम्रता ही महेश बाबूला गालावर किस करताना पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेला हा फोटो १८ वर्षे जुना आहे. “आम्ही आमच्या आयुष्यात घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयाला आज १८ वर्ष पूर्ण झाली. हॅप्पी अॅनिव्हर्सरी MB”, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ चाहत्याच्या प्रश्नावर पत्नी नम्रता म्हणाली…

अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता अभिनेत्री नम्रता शिरोडकरला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला. महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.