दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा जगभरात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. पण, काही दिवसांपूर्वी त्याची लेक सिताराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती एका जाहिरातीच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर झळकली. त्या जाहिरातीसाठी तिने मोठे मानधनही आकारलं. आता त्या पैशांचं तिने काय केलं आहे हे समोर आलं आहे.

महेश बाबूची ११ वर्षांची लेक सितारा एका ज्वेलरी ब्रँडची ॲम्बेसिडर म्हणून ४ जुलै रोजी टाइम्स स्क्वेअरवर झळकली. तिचे फोटो लगेचच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. सितारा टाइम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली भारतीय स्टारकिड ठरली आणि याबाबतीत तिने सारा अली खान, जान्हवी कपूर, सुहाना खान यांनाही मागे टाकलं.

आणखी वाचा : टाइम्स स्क्वेअरवर झळकण्यासाठी महेश बाबूच्या ११ वर्षांच्या लेकीने घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

या जाहिरातीमध्ये सितारा डिझायनर ड्रेस परिधान करून आणि साडी नेसून त्यावर भारतीय पद्धतीचे दागिने घालून फोटोसाठी पोज देताना दिसली. या एका जाहिरातीसाठी तिने तब्बल एक कोटी मानधन घेतलं आहे. तिने घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या; तर आता या पैशाचा योग्य वापर करायचं तिने ठरवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “प्रवास अजूनही सुरुच आहे…”, ‘सॅम बहादुर’च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल भावूक

मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबूची लेक सिताराने तिला एका जाहिरातीतून मिळालेलं हे पहिलं मानधन एका संस्थेला दान केलं आहे. सिताराच्या या निर्णयाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.