दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा जगभरात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या एका वेगळ्याच कारणामुळे तो आणि त्याची लेक चर्चेत आले आहेत. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याची मुलगी सितारा. सितारा नुकतीच एका जाहिरातीच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर झळकली. पण ही जाहिरात करण्यासाठी तिने मोठं मानधन घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महेश बाबूची लेक सितारा आता ११ वर्षांची आहे. पण मानधनाच्या बाबतीत तिने अनेक स्टारकिड्सना मागे टाकलं आहे. एका ज्वेलरी ब्रँडची ॲम्बेसिडर म्हणून ४ जुलै रोजी तिची झलक टाइम स्क्वेअरवर दाखवण्यात आली. तिची ही जाहिरात आणि तिचे फोटो लगेचच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. या जाहिरातीसाठी तिने किती मानधन घेतलं हा आकडा आता समोर आला आहे.

आणखी वाचा : एस.एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट असणार ‘या’ जॉनरचा, महेश बाबू साकारणार मुख्य भूमिका

या जाहिरातीमध्ये सितारा डिझायनर ड्रेस परिधान करून आणि साडी नेसून त्यावर भारतीय पद्धतीचे दागिने घालून फोटोसाठी पोज देताना दिसली. तिची ही जाहिरात टाईम स्क्वेअरवरही दाखवण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, या एका जाहिरातीसाठी तिने तब्बल १ कोटी मानधन घेतलं आहे.

हेही वाचा : मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महाराष्ट्राचा जावई महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

यानिमित्ताने सितारा टाइम स्क्वेअरवर झळकणारी पहिली भारतीय स्टारकिड ठरली आहे. याबाबतीत तिने सारा अली खान, जानवी कपूर, सुहाना खान यांनाही मागे टाकलं आहे.